Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका भन्साळींची आवडती अभिनेत्री

By admin | Updated: August 6, 2014 00:57 IST

देसी गर्ल अशी ओळख असलेली प्रियंका चोप्रा निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

देसी गर्ल अशी ओळख असलेली प्रियंका चोप्रा निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची आवडती अभिनेत्री बनली आहे. भन्साळींच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत यापूर्वी ऐश्वर्या रॉय आणि राणी मुखर्जी यांच्या नावांचा समावेश होता. या दोघींनंतर दीपिका पदुकोन त्यांची आवडती अभिनेत्री बनली. दीपिकासोबत त्यांनी ‘रामलीला : गोलियो की रासलीला’ हा चित्रपट बनवला होता, आता तिला ‘बाजीराव मस्तानी’साठी फायनल केले आहे. प्रियंकाने ‘गुंडे’मध्ये आयटम साँग केले होते. त्यानंतर आता ‘मेरी कॉम’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे. तिचे काम पाहून भन्साळींनी आयोजित केलेल्या खास पार्टीसाठी प्रियंकासह तिच्या मित्रंना आमंत्रण दिले होते.