Join us

प्रियंकाने केले पाश्र्वगायन

By admin | Updated: November 12, 2014 00:23 IST

प्रियंका चोप्राने एका आंतरराष्ट्रीय म्युजिक कंपनीसोबत केलेल्या करारानुसार तिला तिच्या चित्रपटांमध्ये गाणी गाण्याची परवानगी नव्हती.

प्रियंका चोप्राने एका आंतरराष्ट्रीय म्युजिक कंपनीसोबत केलेल्या करारानुसार तिला तिच्या चित्रपटांमध्ये गाणी गाण्याची परवानगी नव्हती. या म्युजिक  कंपनीने प्रियंकाच्या म्युजिक अल्बमची निर्मिती केली होती. आता मात्र प्रियंकाने जोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटासाठी पाश्र्वगायन केले आहे. सूत्रंनुसार प्रियंकाने ‘मेरी कॉम’ या चित्रपटात एक अंगाई गीत गुणगुणले होते; पण ‘दिल धडकने दो’साठी मात्र तिने एक गाणो गायले असून चित्रपटाच्या एंड क्रेडिटसाठी ते वापरले जाणार आहे. प्रियंका लॉस एंजिलिसला रवाना झाली असून तेथे जाण्यापूर्वी तिने हे गाणो रेकॉर्ड केले. या गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आहे. या गाण्यासाठी चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.