Join us

Video : आपल्या डोळ्यांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या प्रियाच्या आवाजाचेही तुम्ही व्हाल फॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 14:27 IST

प्रियाचा गाणं गातांनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

मुंबई : आपल्या डोळ्यांच्या दिलखेचक इशाऱ्यांनी प्रेक्षकांना घायाळ केल्यानंतर आता प्रिया प्रकाशचा सुरेल आवाड श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आहे. प्रियाचा गाणं गातांनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्रिया ही एक चांगली गायिकाही असल्याचं या व्हिडीओवरुन दिसत आहे. 

प्रिया नुकतीच एका गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये गेली होती. या शोमध्ये तिने एक गाणं गायलं असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रिया एक तमिळ भाषेतील गाणं गातांना दिसत आहे. हे गाणं साऊथमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. त्यात हे प्रियाने गायलं म्हणून लोक व्हिडीओ अधिकच शेअऱ करत आहेत. 

प्रियाच्या व्हायरल व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. तिचा सिनेमाही रिलीज होणार आहे. रातोरात स्टार होणं काय असतं हे प्रियाने दाखवून दिलं आहे. 

टॅग्स :प्रिया वारियर