Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मला फरक..." लेस्बियन बोल्ड सीनवर प्रिया बापट स्पष्ट बोलली; म्हणाली, "दोन दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 08:31 IST

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या पहिल्या भागात प्रियाचा एक बोल्ड सीन व्हायरल झाला होता.

मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. सिटी ऑफ ड्रीम्सला तुफान प्रतिसाद मिळतोय आता आणि सिरीजचा तिसरा सिझन आला आहे. राकारणावर आधारित या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट सोबतच अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर, एजाज खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सध्या वेबसिरीजची टीम प्रमोशनात व्यस्त आहे. दरम्यान प्रिया बापटला सिरीजच्या पहिल्या भागातील 'त्या' सीनवर प्रश्न विचारण्यात आला.

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या पहिल्या भागात प्रियाचा एक बोल्ड सीन व्हायरल झाला होता. यामध्ये तिने एका मुलीला किस केलं होतं. यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या प्रियाला ट्रोलही करण्यात आलं. नुकतंच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत प्रियाला त्यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, " तेव्हा तो एकच सीन जास्त व्हायरल झाला आणि मला दोन दिवस त्याचा मानसिक त्रास झाला. तो सीन कथेची गरज होता आणि काम म्हणून मी तो सीन केला. ते तेवढ्यापुरतंच  होतं आणि वेबसिरीज केवळ त्या एका गोष्टीवर आधारलेली नव्हतीच. तसं जरी असतं तरी मला तो सीन करण्यात अडचण नव्हती. त्या पात्राच्या आयुष्याचा तो एक भाग होता."

ती पुढे म्हणाली, "लोकांनी पडद्यावरील आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घेतलं पाहिजे. मी साकारलेलं पात्र समलैंगिक असेल तर तो सीन करणं कथेची गरज आहे. एक अभिनेत्री म्हणून माझं ते कामच आहे. पण लोकांना मात्र तोच विषय चघळत बसायचा आहे. पण आता मला त्याचा त्रास होत नाही."

'सिटी ऑफ ड्रीम्स' सिझन १ चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता त्याचा तिसरा भाग आला आहे जो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. प्रिया बापट या सिरीजमुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. तिच्या भूमिकेचंही कौतुक होतंय.

टॅग्स :प्रिया बापटमराठी अभिनेतावेबसीरिजअतुल कुलकर्णीसचिन पिळगांवकर