अभिनेत्री कंगना रनावतने ‘क्विन’च्या यशस्वीतेनंतर फी वाढवली आहे़ २७ वर्षीय अभिनेत्री कंगना रानावतने सांगितले की, मी याची हकदार आहे़ फी वाढवण्यामागे काही विशेष कारण नाही़ कंगना म्हणाली की, मी बॉलीवूडमध्ये मागील सात वर्षांपासून काम करीत आहे़ आतापर्यंत मी जे यश मिळवले आहे त्याच्या आधारावर मी फी वाढवली आहे़ २००६ मध्ये चित्रपट ‘गँगस्टर’द्वारे बॉलीवूडमध्ये करिअरला सुरुवात करणाऱ्या कंगनाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत़ ‘क्विन’ आणि ‘रिव्हॉल्व्हर राणी’ चित्रपटामुळे कंगनाला आपला अभिनय दाखवण्याची उत्कृष्ट संधी मिळाली व तिने त्याचे सोने केले़ अनेक खस्ता खाल्ल्यावर तिने आज बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे़ तिच्या मेहनतीमुळेच आज तिची किंमत बॉलीवूडमध्ये वाढली आहे़
कंगनाचा भाव वाढला
By admin | Updated: August 3, 2014 23:27 IST