Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेमाची गोष्ट' मधील मुक्ताची लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रोमॅन्टिक पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:43 IST

'प्रेमाची गोष्ट' फेम स्वरदा ठिगळेची लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रोमॅन्टिक पोस्ट, म्हणाली...

Swarda Thigale: 'प्रेमाची गोष्टी' (Premachi Goshata) ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. अभिनेता हर्ष हंचनाळे आणि स्वरदा ठिगळे यांची मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेती प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सागर-मुक्ताच्या जोडी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. दरम्यान, ही मालिका प्रेक्षकांमध्ये सातत्याने चर्चेत राहिला आहे. तेजश्री मालिकेत मुक्ता ही मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या अचानक मालिकेतून जाण्याने चाहत्यांची खूप निराशा झाली. त्यानंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत दिसते आहे. तिच्या अभिनयाला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. अशातच नुकतीच स्वरदाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, स्वरदा ठिगळेने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे. स्वरदा तिच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच नवरा सिद्धार्थसोबत गोव्यामध्ये फिरायला गेली आहे. याचे काही सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करुन लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केले आहेत. "केसांमधील वाळू, हवेतील बोचरेपणा आणि सुंदर आठवणी तयार करण्यासाठी ही पद्धत..., ३६५ दिवस एकत्र सहवासाचे...",असं सुंदर कॅप्शन देखील अभिनेत्रीने या पोस्टला दिलं आहे. 

स्वरदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने २०१३ मध्ये आलेल्या 'माझे मन तुझे झाले' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'प्यार के पापड', 'सावित्री देवी' या हिंदी मालिकांमधूनही काम केलं आहे. अखेरची स्वरदा स्वराज्य 'सौदामिनी ताराराणी' या मालिकेत झळकली. त्यानंतर आता अभिनेत्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून दमदार कमबॅक केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया