Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेता लग्नबंधनात अडकला, तेजश्री प्रधानची गैरहजेरी; पोस्ट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 09:41 IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सागर, कोमल, छोटी सई या कलाकारांनी मात्र लग्नाला हजेरी लावली होती.

अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता या भूमिकेत दिसत होती . तिने मालिका सोडून आता महिना उलटून गेला आहे. नुकतंच मालिकेतील अभिनेता आयुष भिडे (Aayush Bhide) लग्नबंधनात अडकला असून मालिकेतील काही सहकलाकारांनी त्याच्या लग्नात हजेरी लावली. तेजश्री मात्र लग्नाला गेली नाही. तरी तिने आयुषसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता आयुष भिडे लोकप्रिय 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लकी कोळीची भूमिका साकारत आहे. लकी हा मुक्ताचा दीर म्हणजे सागर कोळीचा सख्खा भाऊ दाखवण्यात आला आहे. आयुष आणि तेजश्रीचा मालिकेच्या सेटवर चांगला बाँड होता. नुकताच आयुष लग्नबंधनात अडकला असून तेजश्रीने फोटो शेअर करत लिहिले, "आयुष तुला खूप शुभेच्छा. तुझं वैवाहिक जीवन शांत आणि सुखसमृद्धीचं होवो." यासोबत तिने दृष्ट लागून नये यासाठी इमोजी शेअर केलं आहे. तेजश्री आयुषच्या लग्नाला गेली नसली तरी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या.

तर दुसरीकडे प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुख्य अभिनेता राज हंचनाळे म्हणजे सागर कोळी ऑनस्क्रीन भावाच्या लग्नसोहळ्याला पोहोचला. तसंच मालिकेतील त्यांची छोटी बहीण कोमल म्हणजेच अभिनेत्री लक्ष्मीनेही लग्नात हजेरी लावली. कोमलने लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यात मालिकेतील सागरची छोटी मुलगी चिमुकली सई सुद्धा दिसत आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेत आता तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे मु्क्ता या भूमिकेत दिसत आहे. मालिकेच्या वेळेतही बदल झाला आहे. त्यामुळे टीआरपीवर काहीसा परिणाम झाला आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान मराठी अभिनेतालग्नसोशल मीडिया