एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियाशी सुरू असलेल्या वादामुळे सध्या प्रीती झिंटा चर्चेत आहे. ‘ईश्क इन पॅरिस’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करणारी प्रीती आता सनी देओलसोबत ‘भय्याजी’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘भय्याजी’मध्ये प्रीती एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रीती या चित्रपटात एका गँगस्टरची मुलगी आणि सनीच्या पत्नीच्या रूपात दिसेल. प्रीतीने यापूर्वी सनीसोबत हीरो या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पाठक करणार आहे. नीरज यांच्यानुसार या चित्रपटातून प्रीती तिची शहरी प्रतिमा बदलू शकेल. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अद्याप १२ दिवस बाकी आहेत.
‘भय्याजी’मध्ये प्रीती झिंटा
By admin | Updated: July 3, 2014 13:50 IST