Join us

प्रीती ‘सुलतान’वर फिदा

By admin | Updated: February 3, 2016 02:33 IST

सल्लुमियाँ त्याच्या आगामी चित्रपटात म्हणजेच ‘सुलतान’मध्ये पहिलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. खास हरियाणवी ढंगात त्याला दाखवण्यात आले आहे.

सल्लुमियाँ त्याच्या आगामी चित्रपटात म्हणजेच ‘सुलतान’मध्ये पहिलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. खास हरियाणवी ढंगात त्याला दाखवण्यात आले आहे. त्याची जुनी मैत्रीण प्रीती झिंटा त्याच्या या हरियाणवी ढंगावर भलतीच फिदा आहे म्हणे. प्रीती म्हणाली, ‘मी क्रिकेट लीगच्या दरम्यान माझा ‘चोरी चोरी छुपके छुपके’ चित्रपटाचा नायक सलमानला भेटले, तेव्हा मला त्याला चटकन ओळखणे मुश्कील झाले. तो पक्का हरियाणाचा दिसत आहे. एकदम रॉकिंग. सलमान आणि प्रीतीने आतापर्यंत ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘जानेमन’, ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सल्लू सध्या सुलतानमय झाला आहे म्हणे.