संजय लीला भन्साली यांच्या दिग्दर्शनाखाली ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा अशी तगडी स्टार मंडळी यात काम करीत आहेत. बाजीराव पेशव्यांची भूमिका करणारा अभिनेता रणवीर सिंह शूटिंगपूर्वी प्रार्थना करतो म्हणे. तो म्हणाला की, माझ्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरणारा आतापर्यंतचा हा सर्वात कठीण चित्रपट आहे. त्यामुळे मी या भूमिकेविषयी खूप जास्त कॉन्शिअस आहे. त्यामुळे मी शूटिंगपूर्वी दिग्दर्शकांकडून थोडा वेळ मागून घेतो आणि मी काही वेळ शांत बसतो. देवाची प्रार्थना करतो. लहान मुले किंवा विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये प्रार्थना करीत असतात. तशीच माझी सवय मला इथपर्यंत घेऊन आली. मला या प्रार्थनेमुळे मानसिक स्थैर्य मिळते. माझा दिवस अतिशय उत्तम जातो.
शूटिंगपूर्वी रणवीर करतो प्रार्थना
By admin | Updated: July 30, 2015 05:04 IST