Join us

"तुला आयुष्यभर...", प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 13:15 IST

मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे. एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे हे नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं.

मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (pravin tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे हे नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते कायमच चर्चेत असतात.  प्रवीण यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी स्नेहल तरडेदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

स्नेहल कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे कायम त्या नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. आज प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओ त्या प्रवीण तरडेंसोबत पायऱ्यांवरुन बसून गप्प मारताना दिसतायेत. बॅकग्राऊंडला 'यारियां २' चित्रपटातील  'ऊंची ऊंची दीवारे' हे गाणं लावण्यात आलं आहे.  हा व्हिडीओ शेअर करत स्नेहलने लिहीलं आहे, ''वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियवरा! धकाधकीच्या जीवनात, कामाच्या धबडग्यात प्रेमाचे असे गोड, निवांत क्षण तुला आयुष्यभर लाभोत या शुभ कामना!'' स्नेहल तरडे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रवीण तरडेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :प्रवीण तरडे