Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांसाठी अभिनेते प्रशांत दामलेंची लाखमोलाची मदत

By admin | Updated: October 1, 2015 12:41 IST

मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत दिली आहे. गुरुवारी प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला असून जलयुक्तशिवार योजनेसाठी ही मदत वापरली जाणार आहे. 
पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण दुष्काळाचे सावट असून दुष्काळग्रस्तांसाठी सिने व क्रीडा क्षेत्रातील मंडळी सरसावली आहेत मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी 'नाम' संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली आहे. अक्षय कुमारनेही दुष्काळग्रस्तांना ९० लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. या यादीत आता प्रशांत दामले यांचाही समावेश झाला आहे. दामले यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.