Join us

प्रसाद ओक आणि मंजिरीने दिली गुडन्यूज! अभिनय-दिग्दर्शनानंतर आता 'या' क्षेत्रात ठेवलं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:33 IST

प्रसाद आणि मंजिरी ही जोडी चाहत्यांनाही आवडते. मराठी इंडस्ट्रीतील ही जोडी रील बनवून चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करते. आता प्रसाद आणि मंजिरी मिळून त्यांचं युट्यूब चॅनेल सुरू करत आहे. 

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. प्रसादच्या सिनेइंडस्ट्रीतील करिअरमध्ये मंजिरीने त्याची भक्कम साथ दिली आहे. अभिनेत्याच्या यशस्वी होण्यामागे मंजिरीचा मोठा वाटा आहे. प्रसाद आणि मंजिरी ही जोडी चाहत्यांनाही आवडते. मराठी इंडस्ट्रीतील ही जोडी रील बनवून चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करते. आता प्रसाद आणि मंजिरी मिळून त्यांचं युट्यूब चॅनेल सुरू करत आहे. 

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रसाद-मंजिरीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. आता इन्स्टाग्रामसोबतच प्रसाद-मंजिरी युट्यूबच्या माधम्यातून चाहत्याचं मनोरंजन करणार आहेत. 'Prasad & Manjiri Oak' असं त्यांच्या युट्यूबचं नाव आहे. "बरेच दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून काहीतरी वेगळं करायचं हे मनात चालू होतं. खरं तर हे बऱ्याच जणांनी केलंय पण आम्ही केलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की आपण पण हे करुया. आम्ही दोघं आमचं युट्यूब चॅनेल सुरू करतोय. हीच बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती", असं प्रसाद व्हिडिओत म्हणत आहे. 

"प्रसाद म्हणाला तसं आम्हाला खूप वर्ष हे करायचं होतं. पण, खरं सांगायचं तर धाडस होत नव्हतं. आणि हे सगळं करायला धाडस लागतं. कुणीतरी उगाचच उठून हे नाही करू शकत. त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो. पॅशन लागते, त्याचं ज्ञान लागतं...पण आम्हाला असं वाटलं की करून बघुया. याचं थोडंसं क्रेडिट मी अमृता खानविलकरला देते. ती जवळ जवळ गेली ३ वर्ष माझ्या डोक्यावर बसलीये की हे तुम्ही करा. पण, आम्ही हे करू शकत नव्हतो. आता थोडासा वेळ काढून करायचं ठरवलंय. बघुया आता हे कसं काय जमतंय. आम्ही आम्हालाच एक संधी दिलीये. तुम्ही पण यात साथ द्या", असं म्हणत मंजिरीने चाहत्यांना आवाहन केलं आहे. 

पुढे प्रसाद म्हणतो, "बरेच लोक आमच्या लागले होते की तुम्ही युट्यूब चॅनेल सुरू करा. पण, आमचं ठरत नव्हतं की काय करायचंय. आता मला तुम्हाला विचारायचंय की आमच्या यु्ट्यूबवर तुम्हाला काय काय बघायला आवडेल. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. युट्यूब चॅनेल सुरू केलेलं आहे. त्याला लाइक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. बरेच जण म्हणत्यात की पॉडकास्ट सुरू करा. तर मी तसं काही करणार नाहीये. कारण, पॉडकास्टचं पीक बाजारात आहे. पॉडकास्ट सुरू करण्यात सध्या तरी मला काही मजा नाही". 

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेता