Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इंसान ६० की उम्र मे सठिया जाता है', प्रार्थना बेहेरेने थेट बिग बींना विचारलेला प्रश्न; सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:03 IST

प्रार्थना बेहेरेने अमिताभ बच्चन यांच्याशी घेतलेला पंगा, नक्की काय झालं?

मराठीतील देखणी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. मालिका, सिनेमांमधून तिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रार्थना आधी मनोरंजन पत्रकार होती. तिने मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं होतं. पत्रकारितेच्या काळात तिने सेलिब्रिटींना अनेक वादग्रस्त प्रश्न विचारले आहेत. संजय दत्तससोबतचा किस्सा तिने याआधी सांगितला होता. तर आता तिने अमिताभ बच्चन यांना विचारलेल्या प्रश्नाबद्दल नुकतंच सांगितलं. नक्की काय होता तो प्रश्न? वाचा

'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना बेहेरेने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा किस्सा सांगितला. ती म्हणाली,"नि:शब्द सिनेमाची पत्रकार परिषद होती. दुनियाभरचे पत्रकार तिथे आले होते. सिनेमाची गोष्टच अशी होती की ६० वर्षांचा माणूस १६ वर्षांच्या मुलीवर प्रेम करतो. तर अमिताभ सतत कथा अशी आहे याबद्दल सांगत होते. पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तेव्हा मी हात वर केला. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि त्या वयात आपण अगदीच बिंधास्त असतो तशीच मी होते."

ती पुढे म्हणाली,"मी अमितजींना प्रश्न विचारला की, 'लोक बोलते है की इंसान ६० साल के बाद सठिया जाता है, तो क्या इस फिल्म मे आप ने सठिया जाने की वजह से १६ साल की लडकी के साथ प्यार किया?' हे मी त्या सिनेमाबद्दलच विचारत होते पण तेव्हा अमिताभ बच्चनही ६० वर्षांचे झाले होते. त्यांच्या वाढदिवसालाच या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे खूप लोकांनी तो प्रश्न वैयक्तिक घेतला की मी अमितजींनाच तसं बोलले. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की,'ते तुम्हाला सिनेमा पाहून समजेल'. माझा हा प्रश्न खूप बिंधास्त होता आणि एका चॅनलच्या हेडला माझा हा बिंधास्तपणा आवडला आणि त्याने मला नोकरी दिली."

English
हिंदी सारांश
Web Title : Prarthana Behere's Bold Question to Big B: A Story

Web Summary : Actress Prarthana Behere, a former journalist, recounted asking Amitabh Bachchan a daring question about his film where a 60-year-old man loves a 16-year-old girl. Her bold question impressed a channel head, landing her a job.
टॅग्स :प्रार्थना बेहरेमराठी अभिनेताअमिताभ बच्चन