Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीका रावचा पत्ता कट, संजिदाने मारली बाजी

By admin | Updated: April 10, 2017 05:07 IST

ए खाद्या भूमिकेसाठी आॅडिशनला गेल्यानंतर दुसऱ्याच भूमिकेसाठी कलाकाराची निवड झाल्याचे

ए खाद्या भूमिकेसाठी आॅडिशनला गेल्यानंतर दुसऱ्याच भूमिकेसाठी कलाकाराची निवड झाल्याचे आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळते. असाच काहीसा प्रकार प्रतीकाबरोबर घडला आहे. आता सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांच्या नव्या मालिकेत प्रतीका एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेचे नाव ‘उतरे ना रंग माही’ असे ठेवणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेतील एका वेगळ्याच भूमिकेसाठी प्रतीकाने आॅडिशन दिले होते. पण एका वेगळ्याच भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. प्रतीका रावने या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी आॅडिशन दिले होते. तिचे आॅडिशन तर खूप छान झाले होते. पण प्रतीका मुख्य भूमिकेपेक्षा दुसऱ्या भूमिकेसाठी योग्य आहे असे प्रोडक्शन टीमला वाटत असल्याने तिची दुसऱ्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आणि मुख्य भूमिका संजिदा शेखला देण्यात आली. या मालिकेत किथ सिक्वेरा प्रमुख भूमिकेत झळकणार असून, या मालिकेद्वारे सोनी राजदान अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत.