Join us

Prakash Raj : 'हिंदी माहित नाही, जा!' प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटवरुन पुन्हा वाद, FIR दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:39 IST

अभिनेता प्रकाश राज यांचं एक तीन वर्षांपूर्वीचं ट्वीट पुन्हा व्हायरल होत आहे.

Prakash Raj : अभिनेता प्रकाश राज यांचं एक तीन वर्षांपूर्वीचं ट्वीट पुन्हा व्हायरल होत आहे. १३ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोतील शर्टवर जो मजकूर होता त्याने वाद उफाळून आला होता.  त्यावर लिहिले होते, 'मला हिंदी माहित नाही, जा.' आता तीन वर्षांनंतर हा फोटो पुन्हा व्हायरल होण्यामागचं कारण म्हणते सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक शेखर यांनी प्रकाश राज यांचा हा फोटो ट्वीट करत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

वकील शशांक शेखर यांनी तमिळनाडू पोलिसांना टॅग करत प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, 'तुम्ही प्रकाश राज विरोधात एफआयआर दाखल केली का?' तर यावर प्रकाश राज यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे.

त्यांनी ट्वीट केले, 'माझं मूळ, माझी मातृभाषा कन्नड आहे. जर तिचा अनादर केला किंवा तुमची भाषा थोपवण्याचा प्रयत्न केला..तर आम्ही अशाप्रकारे विरोध करु. तुम्ही धमकी देत आहात का ? असंच विचारलं.'

आणखी एक ट्वीट करत ते म्हणाले, 'मला सात भाषा येतात. एखादी भाषा शिकणं आणि ती बोलणं म्हणजे त्या लोकांचा आदर करणं आहे. मी माझी भाषा कोणावर थोपवत नाही. पण जर कोणी तिचा अनादर केला तर मी त्याविरोधात आवाज उठवेन. #stopHindiImposition #justasking

२०२० मध्ये हिंदी दिवस साजरा करताना काही दाक्षिणात्य अभिनेत्यांनी याचा विरोध केला होता. यामध्ये प्रकाश राज, धनंजय आणि वरिष्ठ एन सिन्हा यांनी हिंदी भाषा थोपली जाते त्यावरुन मत व्यक्त केलं होतं.

टॅग्स :प्रकाश राजहिंदीकन्नड