Join us

दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादेत होणार शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 10:13 IST

Prakash Raj meets with an accident : खुद्द प्रकाश राज यांनीच ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना अपघात झाल्याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देअलिकडेच प्रकाश राज यांचा नेटफ्लिक्सवर 'नवरसा' हा सिनेमा रिलीज झाला आहे.  याशिवाय केजीएफ 2, पोन्नीयन सेल्वम, पुष्पा असे त्यांचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. 

साऊथ इंडस्ट्रीचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांना पडल्यामुळे फ्रॅक्चर झाला असून लवकरच त्यांच्यावर हैदराबादेत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.खुद्द प्रकाश राज यांनीच ट्विट करत चाहत्यांना या अपघाताबद्दल माहिती दिली. प्रकाश राज यांना अपघात झाल्याची बातमी क्षणात वा-यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा व्हायरल होऊ लागल्या. त्यामुळे खुद्द प्रकाश राज यांनीच सोशल मीडियावर नेमके काय झाले, ते सांगितले. (Prakash Raj meets with an accident)

‘एक छोटासा अपघात (पडणे), एक छोटाशा फ्रॅक्चर... सर्जरीसाठी माझा मित्र डॉ. गुरूवरेड्डी यांच्याकडे हैदराबादेत जातोय. ठीक होईल, चिंतेचे काहीही कारण नाही. प्रार्थनेत राहू द्या, ’ असे ट्विट त्यांनी केले.

त्यांच्या या ट्विटनंतर अनेक चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्यात. तुम्ही लवकर ठणठणीत व्हाल, असे एका चाहत्याने लिहिले. डॉ. गुरूवरेड्डी, प्लीज यांचा योग्य उपचार करा, अशी कमेंट एका चाहत्याने केली.प्रकाश राज हे साऊथचे बडे स्टार आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंघम’ या चित्रपटात त्यांनी जयकांत शिकरेची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. 

प्रकाश राज यांनी नाटकांपासून अभिनयाची सुरूवात केली. त्यावेळी एका नाटकासाठी त्यांना  केवळ 300 रुपये मिळायचे. पुढे काही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या.  नाटक, मालिकांमध्ये काम करत असताना त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी काम केले. सोशल मीडियावर प्रकाश राज कमालीचे अ‍ॅक्टिव्ह आहे.  अलिकडेच प्रकाश राज यांचा नेटफ्लिक्सवर 'नवरसा' हा सिनेमा रिलीज झाला आहे.  याशिवाय केजीएफ 2, पोन्नीयन सेल्वम, पुष्पा असे त्यांचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. 

टॅग्स :प्रकाश राज