Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अन्न हे पुर्णब्रह्म...आठवून खा' म्हणत प्राजक्ता माळीनं चाहत्यांना केलं हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:23 IST

सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. बरेचसे कलाकार घरातच आहे. कलाकार आपल्या घरांतल्यासोबत वेळ व्यतित करत आहेत आणि सोशल मीडियावर आपले डेली रुटीन शेअर करताना दिसत आहेत. तर काही जण थ्रोबॅक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच एक स्पेशल फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत आणि म्हटले की, खाली बसून, मन लावून, ताजं अन्न,“अन्न हे पुर्णब्रह्म” हे आठवून खा. जशी आपली आजी-आजोबांची पिढी खाण्याबाबतीत नियम पाळायची, जे खायची, ते खा आणि निरोगी रहा. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असते. प्राजक्ताने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. 

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. तसेच तिने डिसेंबर महिन्यात लकडाउनचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जुन्नर येथे पार पडले आहे. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीअंकुश चौधरी