Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील येसूबाई पोहोचल्या शेतावर आणि म्हणाल्या- हा गंध आपल्या मातीचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 18:00 IST

या मालिकेसाठी प्राजक्ताने बरीच मेहनत घेतली होती.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ताच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. प्राजक्ताने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेतातला फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्राजक्ता शेतात उभी आहे आणि तिच्या हातात फावडे आहे.  या फोटोत सोबत प्राजक्ताने हा गंध आपल्या मातीचा ...हा गंध आपल्या अभिमानाचा असे कॅप्शन दिले आहे. 

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली.मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारले होते.

या मालिकेसाठी प्राजक्ताने बरीच मेहनत घेतली होती. तिने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं होते. प्राजक्ता शालेय, आंतरशालेय एकांकिका, नाटकांमध्ये भाग घ्यायची. प्राजक्ताला बॉलिवूड, हिप-हॉप आणि कथ्थक हे सर्व डान्सचे प्रकार येतात.

टॅग्स :प्राजक्ता गायकवाड