टिव्ही अभिनेत्रीच्या आत्महत्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत खळखळ उडाली आहे. काम मिळत नाही म्हणून नैराश्यात गेलेल्या प्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रज्ञाने स्वत: सोबत मुलीचं देखील आयुष्य संपवले आहे. प्रज्ञाची मुलगी श्रृती ही बारावीची विद्यार्थीनी होती. प्रज्ञाने लिहिलेल्या सुसाईडनोटमध्ये कोणावर कोणाताही आरोप केलेला नाही. आपल्या आत्महत्येसाठी कोणाला ही जबाबदार ठरवू नये.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रज्ञाला तिच्या नवऱ्याचे विवाह बाह्यसंबंध असल्याची शंका होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबामध्ये ताण असल्याची चर्चा आहे. प्रज्ञाला काम मिळत नव्हते तर तिचा पती प्रशांत पारकरची नोकरी सुटली होती. त्यामुळे आर्थिक चणचण जावणत होती अशी माहिती आहे. प्रज्ञाने टिव्ही मालिंकामध्ये काम केले आहे पण त्यांनी ज्या सिनेमांमध्ये काम केले त्यातला एकाही अजून रिलीज झालेला नाही. त्यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून काम नसल्याचे शेजारी सांगतात. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
प्रज्ञा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असायच्या. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असायची. प्रज्ञाने मुलीसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोला तिने 'तेरे बिना मेरा वजूद नहीं!!' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे आपल्या मुलीवर ऐवढी प्रेम करणारी आई तिचा आपल्या हाताने जीव कसा घेऊ शकते असा प्रश्न नक्कीच याठिकाणी उपस्थित होतो. प्रज्ञा यांच्या सोशल मीडियावर पतीसोबतचा एक ही फोटो पोस्ट दिसत नाहीय.
प्रज्ञा यांचे पती गेल्या शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता जीमला गेले होते ते 9.30 वाजता ते परत आले, मात्र खूप वेळा कुणी दरवाजा उघडला नाही. शेवटी चावी वाल्याला बोलवून दरवाजा उडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर आता त्यांना मुलीचा आणि पत्नीचा मृतदेह दिसला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले