Join us

प्रभास लवकरच अडकणार लग्नबंधनात, अनुष्का नाही तर..

By admin | Updated: May 30, 2017 19:50 IST

फक्त तेलुगू सिनेमांपुर्ती मर्यादित ओळख असलेल्या प्रभासला बाहुबलीच्या भूमिकेमुळे बॉलिवूडसह जगभरात वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - फक्त तेलुगू सिनेमांपुर्ती मर्यादित ओळख असलेल्या प्रभासला बाहुबलीच्या भूमिकेमुळे बॉलिवूडसह जगभरात वेगळी ओळख मिळवून दिली आहे. प्रभास आणि अनुष्का लग्न करणार असल्याच्या बातम्यां होत्या यावर अनुष्काने जाहिर नाराजीही व्यक्त केली होती. अनुष्का व प्रभासचे लग्न व्हावे, असेच त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण आता आम्ही एक वेगळीच बातमी घेऊन आलो आहोत. होय, आत्तापर्यंत लग्नासाठी तयार नसलेला प्रभास आता बोहल्यावर चढण्यास तयार झाल्याचे वृत्त आहे. प्रभास चेन्नईच्या प्रसिद्ध उद्योगपतीच्या नातीसोबत लग्न करणार आहे. प्रभाससाठी रासी सिमेंटचे चेअरमन भूपती राजा यांच्या नातीचे स्थळ आले आहे. अर्थात याबाबत प्रभास वा त्याच्या कुटुंबीयाकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही. बाहुबलीसाठी प्रभासने स्वत:चे लग्नही पाच वर्षे लांबणीवर टाकले होते. कारण त्याला केवळ आणि केवळ बाहुबलीवर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रभास बाहुबलीचे शूटींग करत असताना त्याला ६ हजार मुलींनी लग्नाची मागणी घातली होती. पण प्रभासने सर्वांना नकार दिला होता.दरम्यान, बाहुबली2नंतर अनुष्का व प्रभासचे नाव जोडले जात आहे. अनुष्का शेट्टी दोन वर्षांपूर्वी लग्न करणार होती. पण प्रभासने तिला लग्न करण्यापासून रोखले, अशीही बातमी होती. अनुष्काने लग्नापेक्षा आपले सगळे लक्ष बाहुबली2वर केंद्रीत करावे, असे प्रभासचे मत होते. ताकद आणि असाधारण शक्तीच्या जोरावर बाहुबलीने प्रेक्षकांना भुरळ घातली. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.