Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांनी घातलाय अनुष्का शेट्टी-प्रभासच्या लग्नाचा घाट, पण ही एक गोष्ट येतेय आड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:03 IST

अनुष्का आणि प्रभासने लग्न करावं ही त्यांच्या कुटुंबीयांची देखील इच्छा आहे, पण.....

बाहुबली (Bahubali) फेम प्रभास (Prabhas) आणि अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. बाहुबलीदरम्यानच या दोन्ही स्टार्सच्या लिंकअपच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. जरी या स्टार्सने नेहमीच या बातम्यांचे खंडन केले असून दोघेही एकमेकांना चांगले फ्रेंड्स म्हणून संबोधतात. 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' मधील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते खऱ्या आयुष्यातही त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासच्या कुटुंबीयांची इच्छा आहे की त्याने अनुष्कासोबत लग्न करुन सेटल व्हावे. पण, प्रभास आणि अनुष्काला त्यांचं मैत्रीचं नातं कायम ठेवायचं आहे.  

प्रभासच्या कुटुंबीयांची इच्छा आहे की, त्यांने सेटल व्हावे. प्रभासही कुटुंबाच्या विरोधात नाहीय, मात्र त्याचा स्वभाव यात अडचण निर्माण करतोय. खरं तर प्रभास फारसा सोशल नाही. तो म्हणतो की तो क्वचितच बाहेर जातो. तो फक्त कामासाठी बाहेर जातो आणि बहुतेक वेळ सेटवर घालवतो. तो वाढदिवसाच्या पार्टीलाही जाणं टाळतो. 

प्रभासच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर त्याचा आगामी 'सालार' या चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर शाहरुख खानच्या 'डिंकी' चित्रपटाशी होणार आहे. 'साहो', 'राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' - प्रभासचे हे तीन चित्रपट सतत फ्लॉप झाले आहेत, त्यामुळे त्याच्या करिअरच्या आशा 'सालार'वर टिकून आहेत. किंग खानसमोर तो कितपत यशस्वी होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :प्रभासअनुष्का शेट्टी