Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासने चार्मी कौरच्या डॉगीसोबत क्लिक केला फोटो, चाहते म्हणाले - 'खरा सिंह तर मागे आहे'

By तेजल गावडे | Updated: November 11, 2020 19:28 IST

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने निर्माती चार्मी कौरच्या डॉगीसोबत नुकताच एक फोटो क्लिक केला आहे जो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. नुकताच प्रभासचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हा फोटो निर्माती-दिग्दर्शिका चार्मी कौरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत प्रभास चार्मी कौरच्या नऊ महिन्याच्या डॉगीसोबत दिसतो आहे. हा फोटो शेअर करत चार्मी कौरने लिहिले की, डार्लिंग माझ्या ९ महिन्याच्या बेबी बॉयसोबत.

चार्मी कौरने शेअर केलेल्या फोटोत प्रभास डॉगच्या मागे बसलेला दिसतो आहे. प्रभासच्या या फोटोवर लोक कमेंट्स करत आहेत. एका फॅनने कमेंट केली आहे की, हा तर एकदम सिंहासारखा आहे..मात्र खरा सिंह तर मागे आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हे देवा दोन सिंह एकाच फ्रेममध्ये आहेत. हे खूप दमदार आहे. हा फोटो मिनिटात व्हायरल झाला.

सुपरस्टार प्रभास सध्या राधेश्याम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सध्या तो युरोपियन देशात या चित्रपटाचे शूटिंग करते आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चनसोबत दिग्दर्शक नाग अश्विनच्या चित्रपटात काम करणार आहे.

तसेच तो तान्हाजी फेम दिग्दर्शक ओम राउतचा चित्रपट आदिपुरूषमुळेही चर्चेत आहे. या चित्रपटात तो श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :प्रभासपूजा हेगडे