अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ३१ मार्च रोजी पूनमने सोशल मीडियावर आपले 'बेबी बंप' दाखवणारे फोटो शेअर करत गरोदर असल्याची घोषणा केली आहे. तिचे हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर जणू कमेंट्सचा पाऊस पडू लागला असून, अवघ्या काही मिनिटांतच ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या मृत्यूचे खोटे नाटक रचून साऱ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या पूनमवर आता सहज विश्वास ठेवणे नेटकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. उद्या १ एप्रिल म्हणजेच 'एप्रिल फूल' असल्याने, हा पूनमचा एखादा नवीन पब्लिसिटी स्टंट तर नाही ना? असा सवाल नेटकरी करत आहेत.
पूनमनं इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूनम आपला टी-शर्ट वर करून बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या फोटोंसोबत तिने कोणतेही मोठे कॅप्शन न लिहिता केवळ गरोदरपणाशी संबंधित इमोजी शेअर केले आहेत. हे फोटो समोर येताच कमेंट्स सेक्शनमध्ये "हे खरं आहे का?" आणि "पुन्हा नाटक सुरू झालं का?" अशा प्रश्न नेटकऱ्यांनी केले आहेत. काही युझर्सनी हे फोटो AI-जनरेटेड असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ही 'एप्रिल फूल'ची तयारी असल्याचं म्हटलं.
पूनम पांडेनं दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या मृत्यूचे खोटे नाटक रचले होते. तिच्या टीमने अधिकृतरीत्या जाहीर केले होते की, गर्भाशयाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला आहे. मात्र, काही दिवसांनंतर ती जिवंत असल्याचे समोर आले आणि तिने हा केवळ 'जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेला स्टंट' असल्याचे सांगितले होते. या कृत्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
पूनम पांडेने २०२० मध्ये तिचा प्रियकर सॅम अहमद बॉम्बे याच्याशी गुपचूप लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच तिने पतीवर मारहाण आणि विनयभंगाचे गंभीर आरोप केले होते. गोव्यात सॅमला याप्रकरणी अटकही झाली होती. त्यानंतर हे जोडपे वेगळे झाले आणि पूनमने ते नाते अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले होते.
Web Summary : Poonam Pandey's 'baby bump' photos have stirred controversy. Doubts arise due to her past hoaxes and April Fool's Day proximity. She previously faked her death and accused her ex-husband of abuse, making people question the pregnancy's authenticity.
Web Summary : पूनम पांडे की 'बेबी बंप' तस्वीरों ने विवाद खड़ा कर दिया है। उनके पिछले धोखे और अप्रैल फूल दिवस की निकटता के कारण संदेह पैदा होता है। उन्होंने पहले अपनी मौत का नाटक किया और अपने पूर्व पति पर दुर्व्यवहार का आरोप लगाया, जिससे लोगों को गर्भावस्था की प्रामाणिकता पर संदेह हुआ।