Join us

सुख कळले! लग्नाला एक महिना होताच पूजाला नवऱ्याकडून ट्रीट, बनवला खास पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 17:12 IST

२८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेशसह सात फेरे घेतले. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने पूजाला नवऱ्याने खास ट्रीट दिली आहे. 

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पूजाचा लग्नसोहळा पार पडला. तिच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेशसह सात फेरे घेतले. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने पूजाला नवऱ्याने खास ट्रीट दिली आहे. 

लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याचं निमित्त साधून पूजासाठी सिद्धेशने खास पदार्थ बनवला. याचा फोटो पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. पूजासाठी सिद्धेशने खास पुलाव बनवल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने "लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने नवऱ्याकडून खास ट्रीट", असं कॅप्शन दिलं आहे. सुख कळले हे गाणंही तिने या फोटोला दिलं आहे. लग्नानंतर पूजा नवऱ्याबरोबर तिचा वेळ आनंदान घालवत आहे. 

काही महिन्यांपूर्वीच पूजाने प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धेशबरोबरचा फोटो शेअर करत तिने साखरपुडा झाल्याचं म्हटलं होतं. पूजाचा पती सिद्धेश चव्हाण कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. पूजादेखील लग्नानंतर कामातून ब्रेक घेत ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. लग्नानंतर पूजा नवऱ्याबरोबर हनिमूनला गेली होती. याचे फोटोही तिने शेअर केले होते. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रेटी वेडिंग