Join us

पूजा भट्ट बनणार लेडी जासूस

By admin | Updated: October 16, 2014 03:17 IST

हेश भट्ट यांची मुलगी, दिग्दर्शक आणि निर्माती पूजा भट्ट अभिनयात पुनरागमन करीत आहे. तब्बल १३ वर्षांनंतर पूजा रिमा कागतीच्या मिस्टर चालू या चित्रपटात अभिनय करताना दिसेल

महेश भट्ट यांची मुलगी, दिग्दर्शक आणि निर्माती पूजा भट्ट अभिनयात पुनरागमन करीत आहे. तब्बल १३ वर्षांनंतर पूजा रिमा कागतीच्या मिस्टर चालू या चित्रपटात अभिनय करताना दिसेल. या चित्रपटात ती एका लेडी जासूसच्या भूमिकेत दिसेल. रिमा कागती यांच्या मागील चित्रपटात आमिर खान आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत होते. मिस्टर चालूमध्ये सैफ अली खान आणि कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहेत. ऋचा चड्ढाही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी पूजा २००१ मध्ये राहुल बोसने दिग्दर्शित केलेल्या एवरी बडी सेज आय एम फाईन या चित्रपटात अभिनय करताना दिसली होती.