Join us  

कंडोमची जाहिरात करणारी 'ती' होती पहिली अभिनेत्री,सडकून झाली होती तिच्यावर टीका आजही असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 12:54 PM

Pooja Bedi shares bold pictures : अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजा बेदीने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते.

ज्येष्ट अभिनेते कबीर बेदी आणि प्रसिद्ध नृत्यांगणा, मॉडेल प्रोतिमा यांची लेक म्हणजे अभिनेत्री पूजा बेदी. आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत तिनेही अभिनय क्षेत्रात एंट्री केली होती. तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत राहीली. विशेष म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी पूजा बेदी लग्नबंधनात अडकली होती.  2003 साली पूजाने पहिला पती फरहान फर्नीचरवालाशी काडीमोड घेत वेगळी झाली होती. पूजाच्या पहिला घटस्फोटाला आता 18 वर्ष झाली आहेत.

 

विशेष म्हणजे पूजा तब्बल पाच पुरुषांबरोबर रिलेशनशिपमध्ये  होती, मात्र अखेर मैनेकसह लग्न करत तिने संसार थाटला. पूजा बेदी करिअरच्या सुरुवातीला अनेकांना मोठा धक्काच दिला होता. . ‘जो जीता वहीं सिकंदर’ या सिनेमाने पूजाला खरी ओळख मिळवून दिली असली तरीही यानंतर तिचा एकही सिनेमा चालला नाही.

 

या सिनेमानंतर पूजाने 'विषकन्या', 'लुटेरे', 'फिर तेरी कहानी याद आए', 'आतंक ही आतंक' आणि 'शक्ति' अशा सिनेमांमध्ये देखील ती दिसली. 'अनेक बोल्ड सीन, किसींग सीन, कामसुत्रची जाहिरात यामुळे पूजा बेदी प्रसिद्ध झाली होती.  90 च्या दशकात कंडोमची जाहिरातीने अभिनेत्री पूजा बेदी तुफान चर्चा झाली.  

पूजाने केलेली कामसूत्रची जाहिरात खूप वादग्रस्त ठरली होती. कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. जाहिरातीला दूरदर्शनवर बॅन करण्यात आलं होतं. बाकीच्या अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता. त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती.

विशेष म्हणजे त्यावेळी कंडोमची जाहिरात करणारी ती पहिली अभिनेत्री होती. अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजाने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते. पूजा बेदी एक्सट्रा मॅरीटल अफेअर आणि सेक्स या विषयावरील तिच्या बोल्ड विधानांमुळे ओळखली जाते. पूजाला पहिल्या लग्नापासून पूजाला दोन मुले आहेत आलिया आणि ओमर.

 

पूजा बेदी आज सिनेमापासून लांब गेली असली तरीही आजही तिच्या बोल्ड अंदाजाने तेवढीच लोकांच्या लक्षात असते. पूजाची मुलगी अलिया फर्निचरवालानेही  'जवानी जानेमन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पूजानंतर आता आलिया जास्त चर्चेत असते.

टॅग्स :पूजा बेदीकबीर बेदी