Join us  

पाच वेळा प्रेमात अपयश, लग्नासाठी अभिनेत्रीने बदलला धर्म, सावत्र आईपेक्षा आहे ४ वर्षांनी मोठी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 8:00 AM

तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत राहीली.

आमिर खानच्या जो जिता वही सिंकदर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू  करणारी पूजा बेदी आज  आपला ५२वा वाढदिवस साजरा करते आहे.  या चित्रपटानंतर ती लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, शक्ती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली. तिने झलक दिखला जा, नच बलिये, बिग बॉस, फिअर फॅक्टर अशा रिॲलिटी शोमध्ये देखील हजेरी लावली होती. पूजाच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्य ही नेहमीच चर्चेत राहिले. 

'अनेक बोल्ड सीन, किसींग सीन, कामसुत्रची जाहिरात यामुळे पूजा बेदी प्रसिद्ध झाली होती. 90 च्या दशकात कंडोमची जाहिरातीने अभिनेत्री पूजा बेदी तुफान चर्चा झाली.पूजाने केलेली कामसूत्रची जाहिरात खूप वादग्रस्त ठरली होती. कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. जाहिरातीला दूरदर्शनवर बॅन करण्यात आलं होतं. बाकीच्या अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता. त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती. 

तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत राहीली.  पूजा बेदीने 1994 मध्ये पारसी मुस्लिम आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट फरहान इब्राहिमशी लग्न केले. पूजा बेदीनेही लग्नाआधी धर्म बदलला होता .पूजाने धर्म बदलून स्वतःचे नाव नूरजहाँ ठेवले. लग्नाच्या 3 वर्षांनी पूजा बेदीची मुलगी आलियाचा जन्म 1997 मध्ये झाला. यानंतर 2000 मध्ये उमर या मुलाचा जन्म झाला. तथापि, मुले झाल्यानंतर पूजा बेदी आणि तिचा नवरा जुळले नाही आणि 2003 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी घटस्फोट घेतला.

रिपोर्टनुसार पूजा पाचवेळा प्रेमात पडली होती. पूजा बेदी आज सिनेमापासून लांब गेली असली तरीही आजही तिच्या बोल्ड अंदाजाने तेवढीच लोकांच्या लक्षात असते. विशेष म्हणजे पूजा तिच्या सावत्र आई पेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे. कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे. आपल्या मुलीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे पूजा बेदीलाही वडिलांचा खूप राग आला होता.

टॅग्स :पूजा बेदी