Join us
Daily Top 2Weekly Top 5

या नायिकेसोबत नात्यात असतानाच आदित्यने ठेवले होते तिच्या मोलकरणीसोबत शरीरसंबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 21:00 IST

या नायिकेला ही गोष्ट कळल्यानंतर तिने आदित्य पांचोलीसोबत ब्रेकअप केले होते.

ठळक मुद्देपूजाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आदित्यने माझ्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीसोबत शरीरसंबंध ठेवले होते. ती मुलगी केवळ १५ वर्षांची होती.

आदित्य पांचोली आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे अनेक वर्षं अफेअर होते. पण त्याच अभिनेत्रीच्या घरातील मोलकरणीसोबत आदित्यचे संबंध असल्याने आदित्य आणि त्या अभिनेत्रीचे ब्रेकअप झाले होते. ही घटना खूप जुनी असली तरी त्याची चर्चा त्याकाळात मीडियात चांगलीच रंगली होती.

आदित्य पांचोली आणि अभिनेत्री पूजा बेदी यांचे अनेक वर्षं अफेअर होते. ते बॉलिवूडच्या पार्टींना, कोणत्याही समारंभात एकत्र दिसत असत. ते अनेक वर्षं नात्यात होते. त्यामुळे ते त्यांच्या रिलेशनशिपबाबत खूप सिरियस असल्याचे सगळ्यांना वाटत होते. त्यावेळात आदित्य पांचोलीचे झरीना वहाबसोबत लग्न झाले होते. त्यांना मुलं देखील होती. पण तरीही आदित्य पूजाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण अचानक त्या दोघांचे ब्रेकअप झाले. या दोघांचे ब्रेकअप होण्यामागे काय कारण होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

पूजा आणि आदित्यचे अफेअर सुरू असल्याने पूजाच्या घरी आदित्यचे नेहमीच येणे-जाणे असायचे. पूजाच्या घरी त्यावेळी घरातील सगळी कामं करण्यासाठी एक मोलकरीण होती. तिचे वय केवळ 15-16 वर्षं होते. पण तिच्यासोबत आदित्यचे शरीरसंबंध असल्याचे पूजाला कळल्यामुळे तिने आदित्यसोबत ब्रेकअप केले होते. तिनेच या ब्रेकअपविषयी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.

एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिच्या आणि आदित्यच्या ब्रेकअप विषयी सांगितले होते की, आदित्यने माझ्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीसोबत शरीरसंबंध ठेवले होते. ती मुलगी केवळ १५ वर्षांची होती. हे संबंध त्या दोघांच्या मर्जीने ठेवण्यात आले असल्याने त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. पण ती मुलगी अल्पवयीन असल्याने तो एक बलात्कारच होता असे माझे ठाम मत आहे. पण ही गोष्ट मला कळल्यानंतर मी त्याच्यासोबत लगेचच ब्रेकअप केले होते. पूजाने मीडियाला दिलेल्या या मुलाखतीनंतर आदित्य पांचोलीवर बलात्काराचा खटला देखील दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :आदित्य पांचोलीपूजा बेदी