प्रिया बापटने एका अल्बमसाठी नुकतेच कवितावाचन केले आहे. प्रेम आणि पाऊस या दोन्ही गोष्टी सगळ्यांच्या खूप जवळच्या असतात. अशाच पावसाचे आणि प्रेमाचे नाते सांगणाऱ्या पहिला पाऊस या कवितेला प्रियाने तिचा आवाज दिला आहे. फिलिंग या म्युझिकल अल्बममधील हे गाणे असून, या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच करण्यात आले. पहिला पाऊस या कवितेविषयी प्रिया सांगते, ‘पाऊस हा माझा सगळ्यात आवडता ऋतू आहे. मी ही कविता लिहिली नसली, तरी या कवितेचे वाचन मी केलेले आहे. कविता वाचन करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. पण, मी हे खूप एन्जॉय केले. अल्बमसाठी कविता वाचन करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.’ प्रियाने व्हॉईस ओव्हर दिलेले हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे.
प्रिया बापटने केले कवितावाचन
By admin | Updated: February 18, 2017 06:17 IST