Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयला आवडतात ‘विलेन’च्या भूमिका

By admin | Updated: August 6, 2014 22:56 IST

अभिनेता अक्षय कुमार त्याचे अॅक्शन सीन्स आणि कॉमेडी भूमिकांसाठी ओळखला जातो. लवकरच अक्षयचा ‘इटस् इंटरटेनमेंट’ हा विनोदी चित्रपट रिलीज होत आहे.

अभिनेता अक्षय कुमार त्याचे अॅक्शन सीन्स आणि कॉमेडी भूमिकांसाठी ओळखला जातो. लवकरच अक्षयचा ‘इटस् इंटरटेनमेंट’ हा विनोदी चित्रपट रिलीज होत आहे. विनोदी भूमिकांपेक्षा नकारात्मक भूमिका निभवायला आवडतात असे त्याचे म्हणणो आहे. तो म्हणाला, ‘खलनायकाला चित्रपटात जास्त फुटेज मिळतो. त्यांच्याकडे करण्यासाठी बरेच काही असते. हीरो नेहमीच हिरोईनच्या संरक्षणात बिजी असतो किंवा आई आणि बहिणीसाठीच्या जबाबदा:या पूर्ण करीत असतो. चित्रपटाच्या शेवटच्या काही दृश्यांमध्ये खलनायक मार खातो, त्यामुळे मला खलनायकाची भूमिका जास्त आवडतात.’ अक्षयने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, अनेक प्रकार अद्याप बाकी आहेत. एवढेच नव्हे तर विनोदी चित्रपटांमध्येही बरेच काही करण्याचे बाकी आहे, असे त्याचे मत आहे.