Join us

हा तर PINK इफेक्ट - अमिताभ बच्चन

By admin | Updated: November 9, 2016 17:44 IST

५०० व १००० नोट चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे अमिताभ बच्चन, रजनीकांतसह अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ - व्यवहारातून ५०० व १०००च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री जाहीर केल्यानंतर देशभरात संमिश्र वातावरण असून हा अतिशय धाडसी निर्णय असल्याचे सांगत काहींनी मोदींचे कौतुक केले आहे. मात्र काही लोकांना हा निर्णय फारसा पटलेला नसून नोटा रद्द करण्याचा निर्णय तत्काळ लागू झाल्याने दैनंदिन कामाकाजात येणा-या अडथळ्यामुळे नागरिक वैतागले आहे. सोशल मीडियावरही हा मुद्दा सध्या भलताचा चर्चेत असून फेसबूक , ट्विटरवर #ModiFightsCorruption हा टॉपिक ट्रेंडिंगमध्ये आहे. 
अनेक महत्वाच्या, चर्चेतल्या मुद्यांवर इतरांप्रमाणेच सोशल मीडियातून मत व्यक्त करणारे सेलिब्रिटी यावेळी तरी कसे मागे राहतील? अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, हुमा कुरेशी, परेश रावल, सुनील शेट्टी, मधुर भांडारकरसह अनेक कलाकारांनी ट्विट करत मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. लवकरच २००० रुपयाची नवीन नोट चलनात येणार असून तिचा रंगही गुलाबी असमारा आहे. याच मुद्यावर भाष्य करत बॉलिवूडचे शहेनशहा म्हणजे अमिताभ बच्चन यांनी हा तर ' PINK' ( पिंक चित्रपटा) इफेक्ट आहे, असे ट्विट केले आहे. 
 
अभिनेता अजय देवगणने तर ‘१०० सोनार की, १ लोहार की’ असे ट्विट करत या निर्णयाला पंतप्रधानांचा मास्टर स्ट्रोक म्हटले
आहे.
तर सुपरस्टार रजनीकांत यांनीही ‘एका नव्या भारताचा जन्म झाला आहे’ असे ट्विट करत  #JaiHind हा हॅशटॅगही जोडला.