Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी खेळाडूवर चित्रंगदाचा चित्रपट

By admin | Updated: October 29, 2014 01:20 IST

खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘मिल्खा सिंह’, ‘मेरी कॉम’ आणि ‘पानसिंह तोमर’ या चित्रपटांना प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘मिल्खा सिंह’, ‘मेरी कॉम’ आणि ‘पानसिंह तोमर’ या चित्रपटांना प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हॉकीचे जादूगर ध्यानचंद आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघांवरही चित्रपट बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘हजारो ख्वाहिंशे ऐसी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी चित्रंगदा सिंह आता चित्रपट निर्मितीत हात अजमाविणार आहे. तिचा पहिला चित्रपट प्रसिद्ध हॉकी खेळाडू संदीप सिंहच्या जीवनावर आधारित असेल. संदीप भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आहे. काही वर्षापूर्वी झालेल्या एका अपघातामुळे संदीपला तब्बल दोन वर्षे व्हीलचेअरवर काढावी लागली; पण तरीही या शूर खेळाडूने भारतीय हॉकी संघात पुन्हा जागा मिळविली. चित्रंगदाच्या मते संदीप सिंहच्या जीवनावरील चित्रपट लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. ज्योती रंधावाशी घटस्फोट घेतल्यानंतर चित्रंगदा आता तिचे सर्व लक्ष तिच्या करिअरवर केंद्रित करू इच्छिते.