Join us  

'झपाटलेला' चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण; पाहा Unseen Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 5:19 PM

1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवलीय. हे चित्रपट आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला.’
2 / 7
या चित्रपटात दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाची आजही लोक आठवण काढतात.
3 / 7
आज १६ एप्रिल रोजी या चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण झाली आहेत.
4 / 7
‘झपाटलेला’ चित्रपटात ‘तात्या विंचू’ची प्रेक्षक आजही आठवण काढतात. त्याच्या ‘ओम फट स्वाहा’ या डायलॉगवर तर चिक्कार मीम्सदेखील बनले आहेत.
5 / 7
या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचे हे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
6 / 7
‘झपाटलेला’ हा मराठीतील एक कल्ट क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. महेश कोठारे यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते.
7 / 7
२०१३ साली याचा दूसरा भाग म्हणजेच ‘झपाटलेला २’ रिलीज झाला होता. ज्यात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपूरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पहिल्या चित्रपटाप्रमाणे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात तो तितका यशस्वी ठरला नाही.
टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमहेश कोठारे