Join us  

"धर्मेंद्रसारख्या हँडसम व्यक्तीला किस करायला...", 'त्या' किसींग सीनबद्दल शबाना आझमींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 5:36 PM

1 / 8
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा बॉलिवूड चित्रपट २८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित झाला. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसींग सीनची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी केलेला लिपलॉक सीन व्हायरल झाला आहे.
2 / 8
या चित्रपटातील किसींग सीनबाबत शबाना आझमींनी नुकतंच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. धर्मेंद्र यांच्याबरोबरचा किसींग सीन पाहून जावेद अख्तर यांची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न शबाना आझमींना विचारण्यात आला.
3 / 8
धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या किसींग सीनबाबत जावेद अख्तर यांच्या प्रतिक्रियेचा खुलासा करत त्या म्हणाल्या, 'त्यांना या सीनबाबत काहीच वाटलं नाही. पण, त्यांना सिनेमातील माझं राऊडी काम खटकलं. पूर्ण चित्रपटात मी टाळ्या वाजवते, शिट्या वाजवते, चिअर करते, ओरडते.'
4 / 8
'मी वेड्यासारखी उत्साही झाले होते. या महिलेला मी ओळखत नाही, असे ते माझ्या बाजूला बसले होते. जेव्हा आम्ही किस करत होतो, तेव्हा लोक हसत होते आणि चिअर करत होते,' असंही पुढे त्या म्हणाल्या.
5 / 8
शबाना आझमी यांनी चित्रपटातील या किसींग सीनच्या शूटिंगबाबतही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, 'शूटिंग करताना कोणतीच अडचण आली नाही. याआधी मी ऑन स्क्रीन किसिंगचे सीन दिलेले नाहीत.'
6 / 8
'पण, धर्मेंद्रसारख्या हँडसम व्यक्तीला किस करायला कोणाला नाही आवडणार.' शबाना आझमी यांनी केलेल्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा रंगली आहे.
7 / 8
दरम्यान, करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटांत रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
8 / 8
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत देशात अवघ्या पाच दिवसांत ६० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात तब्बल १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
टॅग्स :धमेंद्रशबाना आझमीबॉलिवूड