Join us

काय सांगता! सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला रोज लाळ लावते ही अभिनेत्री, म्हणाली- "आपल्या लाळेचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:38 IST

1 / 8
सेलिब्रिटींना त्यांच्या त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. अभिनेत्री स्किन केअरकडे विशेष लक्ष देताना दिसतात. काही अभिनेत्री यासाठी महागडे प्रोडक्ट वापरतात. तर काही स्किन ट्रीटमेंट घेतात.
2 / 8
पण, एक अशी अभिनेत्री आहे जी चेहऱ्यावरील ग्लो आणि सुंदरता वाढवण्यासाठी स्वत:च्याच लाळेचा वापर करते, हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का?
3 / 8
ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तमन्ना भाटिया आहे. अभिनेत्रीने स्वत:च तिच्या ब्युटी सिक्रेटचा खुलासा करताना ही गोष्ट सांगितली होती.
4 / 8
तमन्ना ही साऊथमधली लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. एका मुलाखतीत तमन्नाने तिच्या सौंदर्यामागचं रहस्य उलगडलं होतं.
5 / 8
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली होती की 'मी रोज सकाळी उठून माझी लाळ चेहऱ्याला लावते'.
6 / 8
'आपल्या चेहऱ्यासाठी लाळ अत्यंत फायदेशीर ठरते. रात्रभर आपले तोंड बंद असते. ज्यामुळे अनेक बॅक्टेरिया तयार होतात'.
7 / 8
'हे बॅक्टेरिया तोंडातील लाळेमुळे नष्ट होतात. ज्यामुळे आपल्याला आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही'.
8 / 8
'आपण सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर लाळ लावू शकता. यामुळे पुरळ, मुरुमांचे डाग, आणि जखमही बरी होण्यास मदत होते'.
टॅग्स :तमन्ना भाटियासेलिब्रिटी