प्रकाश झा यांच्या जय गंगाजल सिनेमामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राने पोलिस अधिका-याची भूमिका केली आहे. येत्या १४ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
नीरजा हा १९८६ साली पाकिस्तानात कराचीमध्ये घडलेल्या विमान अपहरणावर आधारीत सिनेमा आहे. त्यावेळी २३ वर्षीय नीरजा भानोत या फ्लाईट अटेंडट तरुणीने अपहत प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान केले होते. सत्यघटनेवर आधारीत या सिनेमाममध्ये सोनम कपूरची मुख्य भूमिका आहे. येत्या १९ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
अलीगड चित्रपटात मनोज वाजपेयी मुख्य भुमिकेत असून एका निलंबित प्राध्यापकाची भूमिका त्याने केली आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
आगामी एअरलिफ्ट सिनेमामध्ये अभिनेता अक्षयकुमार आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेमध्ये आहेत. ९० च्या दशकात इराक-कुवेत युध्दात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचा थरार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. येत्या २२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनयाचा शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्या अभियनाची जुंगलबंदी आगामी वझीर चित्रपटात पहायला मिळणार आहे. यात फरहानने एक एटीसएस अधिकारी रंगवला आहे. आदिती राव हैदरीही मुख्य भूमिकेत आहे. येत्या ७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
आगामी फितूर या चित्रपटातून कॅटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ग्रेट एक्सपेक्टेशन्स या कांदबरीवर आधारीत हा सिनेमा व्हॅलेंटाईन्स डे च्या दोन दिवस आधी १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.