Bads of Bollywood: 'गफूर'च्या मुलीच्या भूमिकेत बुरखा घातलेली मराठी अभिनेत्री प्रत्यक्षात दिसते खूप सुंदर
By देवेंद्र जाधव | Updated: October 9, 2025 13:45 IST
1 / 7शाहरुखचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजने सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. या वेबसीरिजमध्ये गफूरच्या मुलीच्या भूमिकेत एक मराठी अभिनेत्री दिसली होती. 2 / 7संपूर्ण वेबसीरिजमध्ये या अभिनेत्रीने बुरखा घातल्याने तिला कोणीच ओळखू शकलं नाही. परंतु स्वतः या मराठी अभिनेत्रीने खुलासा केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?3 / 7या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे कांचन खिल्लारे. कांचन गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. तिने स्वतःच एक व्हिडीओ पोस्ट करुन याविषयी खुलासा केला आहे4 / 7कांचन खिल्लारेने अनेक मराठी वेबसीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केलंय. एक सेल्फी काढूया ही कांचनची वेबसीरिज चांगलीच गाजली होती5 / 7याशिवाय रंगभूमीवरील अनेक नाटकांमध्ये कांचन सक्रीय आहे. तिचं स्माईल प्लीज नावाचं नाटक युवा पिढीमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे.6 / 7कांचन खिल्लारेला 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये अर्शद वारसी आणि प्रमुख कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. परंतु बुरखा घातल्याने तिचा चेहरा दिसला नाही7 / 7कांचन खिल्लारे प्रसिद्ध नृत्यांगनाही आहे. एकूणच अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रीय असलेल्या कांचनला 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या माध्यमातून बिग बजेट प्रोजेक्टमध्ये काम करायची संधी मिळाली.