Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीकेंडला काय पाहायचं? फ्रायडेला ओटीटीवर रिलीज झालाय भन्नाट कंटेट, हे ७ सिनेमे आणि सीरिज चुकवू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:07 IST

1 / 8
वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर काय पाहायचं? हा प्रश्न नेहमीच सतावतो. स्क्रोल करूनही काही सापडत नाही. पण, या वीकेंडची चिंता मिटली. कारण शुक्रवारीच भन्नाट कंटेट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
2 / 8
युथ, फ्रेंड्स अँड नेबर्स 2 : तरुणांचे जीवन, मैत्री, प्रेम आणि शेजारच्या नात्यांमधील गुंतागुंत यावर आधारित ही सिरीज आहे. दुसऱ्या सीझनमध्ये नात्यांमध्ये आणखी ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळतो. अॅपल टीव्हीवर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.
3 / 8
गँग ऑफ गॅलेशिया 2 : क्राइम आणि अंडरवर्ल्डवर आधारित असलेल्या या सीरिजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. गँग्समधील संघर्ष, सत्ता आणि विश्वासघात यांची कथा अधिक तीव्र स्वरूपात दुसऱ्या भागात दाखवली आहे.
4 / 8
ब्लडहाँड 2 : ही वेब सीरिज एक हॉरर-थ्रिलर सिक्वल आहे. एका भयानक घराभोवती फिरणारी ही कथा भीती, रहस्य आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे.
5 / 8
मा का सम : आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि कुटुंबासाठी केलेल्या संघर्षाची हृदयस्पर्शी गोष्ट दाखवणारा हा फॅमिली ड्रामा आहे. नात्यांची किंमत आणि भावनिक बंध यावर हा चित्रपट आधारित आहे. प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
6 / 8
भाभीजी घर पर है फन ऑन द रन: गाजलेल्या मालिकेचा सिनेमा अलिकडेच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र त्याला फार यश मिळालं नाही. त्यानंतर आता हा सिनेमा झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे.
7 / 8
सितारे जमीन पर : आमिर खानचा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला सितारे जमीन पर सिनेमा अखेर शुक्रवारी सोनी लिव्ह ओटीटीवर रिलीज करण्यात आला. मतिमंद मुलांच्या भावनिक जीवनावर, त्यांच्या क्षमतेवर हा सिनेमा प्रकाश टाकतो.
8 / 8
मामला लीगल है २: मामला लीगल है या लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी कोर्ट रुम ड्रामा असलेल्या या सीरिजमध्ये रवी किशनने जुगाडू वकीलची भूमिका साकारली आहे. दुसऱ्या सीझनमध्ये वकील आणि न्यायालयातील वेगवेगळ्या विचित्र आणि मजेशीर केसेस दाखवल्या जातात. कायद्याच्या गंभीर जगातही हलक्याफुलक्या शैलीत कथा मांडली जाते.
टॅग्स :आमिर खानवेबसीरिज