Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मिर्झापूर'मधील मुख्यमंत्री साहिबाच्या हॉटनेसची चर्चा, खऱ्या आयुष्यात अभिनेत्री आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 13:42 IST

1 / 11
'मिर्झापूर ३' रिलीज झाला असून प्रेक्षक त्याचा खूप आनंद घेत आहेत. या मालिकेत एका विधवा मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा तलवार हिचीही बरीच चर्चा आहे.
2 / 11
'मिर्झापूर'च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये ईशा तलवारने मुख्यमंत्री माधुरी यादव त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. वेब सीरिजमध्ये आपल्या साध्या लूकने मन जिंकणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
3 / 11
'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनमध्ये ईशा पांढरी साडी परिधान केलेल्या विधवेच्या भूमिकेत दिसली होती. पुढे तिचे मुन्ना भैय्याशी लग्न होते. मात्र मुन्ना भैय्याच्या मृत्यूनंतर तिसऱ्या सीझनमध्ये ती पुन्हा एकदा विधवा अवतारात दिसणार आहे.
4 / 11
ईशा तलवार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
5 / 11
काळ्या आणि चंदेरी रंगाच्या मोनोकिनीत ईशा खूपच सुंदर दिसत आहे. ही अभिनेत्री खुल्या केसांनी बीचवर पोज देताना दिसत आहे.
6 / 11
या डेनिम स्कर्ट-टॉपमध्ये ईशा तिचा मॉडर्न लूक दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या लूकला गोल्डन ज्वेलरी टच दिला आहे.
7 / 11
रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री लक्ष वेधून घेत आहे. बन हेअरस्टाईल आणि कमी मेकअपने तिचे सौंदर्य खुलवलं आहे.
8 / 11
प्रिंटेड ब्रालेटसह सॅटिन सलवार परिधान केलेली अभिनेत्री उन्हात खुलेपणाने पोज देताना दिसत आहे.
9 / 11
या पांढऱ्या बॅकलेस ड्रेसमध्ये ईशाच्या सौंदर्याला तोड नाही. मोकळे केस आणि सुंदर हसणारी ही अभिनेत्री छान दिसतेय.
10 / 11
ईशा तलवार लाल रंगाची बिकिनी घालून तिची फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
11 / 11
ईशा तलवारने रेड रंगाच्या ब्लेझरमध्ये अंतर्वस्त्र न घालता फोटोशूट केलंय. हे फोटो खूप चर्चेत आले होते.
टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिज