'पंचायत' फेम 'रिंकी'चा आज वाढदिवस, तिचं खरं नाव माहितीये का? खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:24 IST
1 / 8'पंचायत'(Panchayat) या गाजलेल्या मालिकेतील 'रिंकी' च्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. गावातल्या साध्या मुलीची भूमिका तिने अगदी उत्तम साकारली. सचीवजींप्रमाणेच चाहतेही तिच्या प्रेमात पडले. आज ती ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.2 / 8रिंकीचं खरं नाव सान्विका (Sanvikaa) आहे. मात्र सान्विका हे नावही तिने इंडस्ट्रीत आल्यानंतरच लावायला सुरुवात केली. तिचं कागदोपत्री नाव पूजा सिंह आहे. 3 / 8मात्र पूजा सिंह नावाची आधीच एक अभिनेत्री होती. 'पंचायत' वेब सीरिजचा पहिला सीझन आला तेव्हा अनेक ठिकाणी दुसऱ्या पूजा सिंहलाच सर्वांनी टॅग केलं. यामुळेच रिंकीने नंतर 'सान्विका' हे नाव आत्मसात केलं.4 / 8'पंचायत' सीरिजने सान्विकाला कमालीची लोकप्रियता मिळाली. सीरिजमध्ये साध्याभोळ्या लूकमध्ये असलेली सान्विका खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. 5 / 8सान्विकाने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ही पंचायत ची रिंकी आहे यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. 6 / 8सान्विका मध्य प्रदेशमधील जबलपूरची आहे. तिने इंजिनिअरिंग केलं आहे. मात्र अभिनयात रस असल्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती या इंडस्ट्रीत आलीय. यासाठी ती आईवडिलांशी खोटं बोलून मुंबईत आली होती. 7 / 8सुरुवातीला तिने अनेक ऑडिशन्स दिल्या. काही जाहिराती केल्या. मात्र तिला यश मिळत नव्हतं. अखेर TVF मुळे तिला संधी मिळाली आणि तिचं नशीब चमकलं. 8 / 8तिचे इन्स्टाग्रामवर ४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 'पंचायत' आधी तिने 'हजमत', 'लखन लीला भार्गव' या सीरिजमध्येही काम केलं आहे.