1 / 10हीरामंडी वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फरीदनची भूमिका केली आहे. जी पुरूषांचा द्वेष करते. त्यामुळे दिग्दर्शकाने तिचा मोलकरणीसोबत इंटिमेट सीन दाखवला आहे. त्यामुळे अनेकांना हे पटले नाही. या सीनवरून सोनाक्षीला ट्रोल करण्यात आले. दरम्यान आता यावर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.2 / 10सोनाक्षी सिन्हाने साकारलेल्या फरीदनची आवड एका जेंडरपर्यंत सीमित नाहीये. तिने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुरूवातीला सरांनी मला सांगितले होते की, फरीदन खूपच फ्लूड आहे. लोक हीरामंडी सारख्या ठिकाणी खूप ओपन होताता. सर्वांना माहित आहे की, उत्सादजीदेखील गे होते. संजय सरांना हे वेगळ्या पद्धतीने दाखवायचे होते. 3 / 10आम्ही तुम्हाला फ्लूड शब्दाचा अर्थ सांगतो, हा शब्द त्या व्यक्तीसाठी वापरला जातो, ज्याची आवड एका जेंडर पर्यंत मर्यादीत नसते. 4 / 10फरदीनचे मोलकरणीसोबतचे संबंध दाखवले आहेत. या भूमिकेबद्दल सोनाक्षी म्हणाली की, तिला वयाच्या ९व्या वर्षी विकले जाते. त्यामुळेच ती पुरूषांचा तिरस्कार करते. हे इतके उघडे ठेवण्याचे कारण असू शकते.5 / 10सोनाक्षी पुढे म्हणाली की, जग खूप मोठे आहे. संजय सरांनी बरेच पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सोनाक्षीने सीरिजमध्ये निगेटिव्ह भूमिका केली आहे. जी आपल्या आईला न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. 6 / 10या सीरिजमध्ये तिने आई आणि लेक अशा दोन भूमिका केल्या आहेत.7 / 10सोनाक्षी सिन्हाने हीरामंडीमधील लूक टेस्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर काहींनी तिचं खूप कौतुक केले.8 / 10सोनाक्षी सिन्हाचे या सीरिजमधील कॉश्च्युम खूप भावले होते की तिने हे फोटो प्रॉडक्शनकडून मागून घेतले होते. 9 / 10सोनाक्षी सिन्हाचे हीरामंडीमधील कामाचे सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. 10 / 10हीरामंडी ही वेबसीरिज १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली.