By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:07 IST
1 / 8संजय लीला भन्साळींच्या प्रोजेक्टमध्ये काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. भव्य सेट, कणखर भूमिका, गाणी अशा प्रत्येक अँगलने त्यांचे सिनेमे दमदार ठरतात.2 / 8आघाडीच्या अभिनेत्रीही भन्साळींच्या सिनेमांमध्ये काम करण्यासाठी धडपडतात. त्यांच्या 'देवदास','हम दिल दे चुके सनम' ते आता 'गंगूबाई काठियावाडी' अशा अनेक सिनेमांमधून कलाकारांचं नशीबच फळफळलं.3 / 8दोन वर्षांपूर्वी भन्साळींनी 'हीरामंडी' ही सीरिज आणली. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्डा, अदिती राव हैदरी, संजिदा शेख या अभिनेत्रींचं भूमिका होती. 4 / 8दरम्यान एका मराठी अभिनेत्रीनेही यासाठी ऑडिशन दिली होती. मात्र तिला नंतर रिजेक्ट केलं गेलं. कोण आहे ती?5 / 8ही आहे 'वेड'फेम अभिनेत्री जिया शंकर. जियाने नुकतंच 'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत 'हीरामंडी'बाबतीत खुलासा केला. 6 / 8जिया म्हणाली,'मी हीरामंडीसाठी ऑडिशन दिली होती. 'आलमजेब'च्या भूमिकेसाठी ती ऑडिशन होती. मला वाटतं मला जर ती भूमिका मिळाली असती तर नक्कीच मी त्याचं चीज केलं असतं.'7 / 8'मी ती भूमिका दमदार केली असती. हे मी काही अतिआत्मविश्वासाने सांगत नाहीये पण मला माहितीये मी हे करु शकले असते. अशा भूमिका मी सहजरित्या निभावते.'8 / 8'हीरामंडी'मधील आलमजेबची भूमिका अभिनेत्री शर्मिन सहगलने निभावली होती. मात्र तिचं काम प्रेक्षकांना फारसं आवडलं नव्हतं आणि तिच्यावर टीकाही झाली होती. तसंच ती भन्साळींची भाची असल्यानेच तिची निवड झाली अशीही चर्चा झाली होती.