Join us
Daily Top 2Weekly Top 5

विटी-दांडू

By admin | Updated: November 18, 2014 00:00 IST

‘सिंघम’ अजय देवगण आता मराठी चित्रपट निर्मात्याच्या रुपात महाराष्ट्रात ‘विटी दांडू’ खेळण्यासाठी येतोय. त्याला भेटण्याची संधीही ‘लोकमत युवा नेस्ट’ने ...

‘सिंघम’ अजय देवगण आता मराठी चित्रपट निर्मात्याच्या रुपात महाराष्ट्रात ‘विटी दांडू’ खेळण्यासाठी येतोय. त्याला भेटण्याची संधीही ‘लोकमत युवा नेस्ट’ने उपलब्ध करून दिली आहे.

एका विशेष स्पर्धेमधील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणा:यांना ही संधी मिळणार आहे.

मराठी चित्रपट सध्या आशयाच्या आणि विषयांच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर नावाजला जातोय. याची दखल अजय देवगण यांनीही घेतली असून प्रथमच मराठी चित्रपाच्या निर्मितीमध्ये ते उतरले आहेत.

राज्यातील पश्चिम दक्षिण मराठवाडा विदर्भ आणि खान्देश अशा ५ विभागातून ५ विजेत्यांना अजय देवगणसोबत विटी दांडू खेळण्याची अभूतपूर्व संधीही मिळणार आहे.

या वेगळ्या विषयावरील चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकमत युवा नेक्स्ट’ने ही अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून राज्याच्या विविध भागांमधून ५ विजेते निवडण्यात येणार आहे.