Join us  

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding : तेरे नाम की मेहँदी...! शिवानी रांगोळेनं शेअर केले मेहंदी सोहळ्याचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 11:25 AM

1 / 9
मराठी सिनेसृष्टीतील एक क्यूट कपल विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळे यांची लग्नघटिका जवळ आली आहे.नुकताच त्यांच्या मेहंदीचा सोहळा पार पडला.
2 / 9
विराजस व शिवानीच्या मेहंदी सेरेमनीचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेच. आता शिवानीने मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
फोटोत शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी सजलेली दिसतेय. मेहंदी भरलेल्या हातांनी ती अनेक पोझ देताना दिसतेय.
4 / 9
‘किस्मत की लकीरें भी आज इठलाई है, तेरे नाम की मेहँदी जो हाथोंपर रचाई है,’ असं सुंदर कॅप्शन देत शिवानीने मेहंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत.
5 / 9
फोटोत शिवानी प्रचंड सुंदर दिसतेय. हिरव्या रंगाचा कॉटनचा वन पीस शिवानेनी तिने कॅरी केला आहे. अंगावर फुलांचे दागिने आहेत.
6 / 9
शिवानीच्या हातावरची मेहंदी आणि तिच्या या ड्रेस यामध्ये एका गोष्टीचं साम्य होतं, ती म्हणजे हत्तीची डिझाइन.
7 / 9
विराजस व शिवानी दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आपलं नातं त्यांनी कधीच जगापासून लपवून ठेवलं नाही. एका नाटकाच्या सेटवर या लव्हस्टोरीची सुरूवात झाली होती.
8 / 9
‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
9 / 9
विराजसनं ‘होस्टेल डेज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे.
टॅग्स :शिवानी रांगोळेविराजस कुलकर्णीमृणाल कुलकर्णी