Join us

"तोंडावर बोलते म्हणत लोक मला नावं ठेवतात, पण मी....", उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:15 IST

1 / 7
उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) गेल्या अनेक दशकांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. 'पवित्र रिश्ता' मालिका असो किंवा 'माहेरची साडी' सिनेमामुळे त्यांची 'खाष्ट सासू' अशीच प्रतिमा बनली.
2 / 7
उषा नाडकर्णी खऱ्या आयुष्यातही अशाच खाष्ट, तोंडावर बोलणाऱ्या आहेत असाच अनेकांचा समज असतो. मात्र त्यांनी अनेकदा मुलाखतींमधून हा गैरसमज दूरही केला आहे.
3 / 7
एका मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणालेल्या की, 'लोक मला नावं ठेवतात की मी तोंडावर बोलते. पण मला कधीच त्यामुळे फरक पडला नाही. कारण मी काही चूक करत नाही आणि चूक झालीच तर मी माफी मागालायलाही मागे पुढे पाहत नाही. लहान असो वा मोठा असो मी सॉरी म्हणते.'
4 / 7
'एखादा माणूस जर मला वाटेल तसा बोलत असेल तर मी तो राग मनात ठेवते. मी सोडत नाही.'
5 / 7
'इतकी वर्ष काम केल्यानंतर आज प्रेक्षक माझं कौतुक करतात. आपल्या इंडस्ट्रीत मी किती चांगलं काम करते याबद्दल कोणीही बोलत नाही. मी कोणाशी मैत्री करायला जात नाही. माझा स्वभाव आहे मी कोणाबद्दल काही वाटलं तरच त्यांच्याशी बोलते.'
6 / 7
'मला जे लोक म्हणतात ना मी खडूस आहे. हो, मी खडूस लोकांसाठी खडूस आहे. मला त्यांना शिव्या द्यायलाही वाईट वाटणार नाही.'
7 / 7
'मला कोणी अशी बोलवून कामं दिलेली नाहीत. ज्यांना माहितीये मी बरं काम करते ते मला बोलवतात. एकंदर मी कशी वागते ते बघतात. माझ्या काही मागण्याही नसतात. त्यामुळे मला कामं मिळतात.'
टॅग्स :उषा नाडकर्णीमराठी अभिनेता