Join us
Daily Top 2Weekly Top 5

Riteish Deshmukh: अभिनेता, निर्माता की दिग्दर्शक रितेशच्या सर्वात जवळची भूमिका कोणती? देशमुखांच्या सूनबाईंनी केला खुलासा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:07 IST

1 / 8
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनीत वेड (Ved Marathi Movie) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. यामुळे अभिनेता चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
रितेश देशमुखने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तर जिनिलियाने या चित्रपटातून मराठीत एन्ट्री केली आहे. पहिल्याच मराठी सिनेमात जिनिलियाच्या भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
अभिनेता, निर्माता की दिग्दर्शक या सगळ्यातून रितेशला सर्वात जवळची भूमिका कोणती याबद्दल जिनिलियाने स्वत: खुलासा केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
जिनिलियाने चाहत्यांसोबत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात रितेश त्याच्या मुलांसोबत खेळताना दिसत आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये जिनिलियाने म्हटलंय कि, 'तो एक चांगला अभिनेता निर्माता किंवा दिग्दर्शक असेल पण तो या सगळ्यात सर्वात जास्त तो मुलांचा बाबा आहे. ही भूमिका त्याला सर्वात जास्त आवडते.'(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
रितेश जिनिलियाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले. त्यांना रिहान आणि राहिल मुले आहेत. देशमुख घराण्याची सून झालेल्या जिनिलिया चांगलं मराठी बोलते. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
जिनिलियाने रितेशी लग्न केल्यानंतर महाराष्ट्रीयन संस्कृतीला आपलं केलं. अनेक सर्वाजनिक कार्यक्रमात आपण तिला महाराष्ट्रीय पेहरावात पाहिलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखवेड चित्रपट