मुस्लिम कुटुंबात जन्माला आली, प्रसिद्ध निर्मात्याशी लग्न करुन केलं धर्मांतर; ही ४२ वर्षीय अभिनेत्री कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:45 IST
1 / 7टीव्हीवरील अनेक लोकप्रिय अभिनेत्री आज संसारात रमल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री जी मुस्लिम कुटुंबात जन्माला आली. नंतर तिने हिंदुशी लग्न केले. आज ती दोन्ही धर्माचं पालन करते. कोण आहे ही अभिनेत्री?2 / 7अभिनेत्रीचं नाव आहे आमना शरीफ(Aamna Sharif). २००९ मध्ये तिने आलू चाट सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'एक व्हिलन' सिनेमात तिने रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 3 / 7आमना शरीफ टीव्ही मालिकांमधून लोकप्रिय झाली. 'कसौटी जिंदगी की' मालिकेत ती दिसली. २०१९ साली कसौटी जिंदगी की 2 सुद्धा आली. यात आमनाने कोमोलिका हे खलनायिकेचं पात्र साकारलं.4 / 7आमनाचा मुंबईत १६ जुलै १९८२ साली जन्म झाला. मुंबईतच तिने शिक्षण पूर्ण केलं. २००३ साली तिला बालाजी टेलिफिल्म्सची 'कही तो होगा' मालिका मिळाली. ते एका सुंदर चेहऱ्याच्या शोधात होते. तेव्हा त्यांनी आमना शरीफला सिलेक्ट केलं. या मालिकेत राजीव खंडेलवालसोबत तिने स्क्रीन शेअर केली.5 / 7आमनाने पुढे 'कसौटी जिंदगी की','कुमकुम','काव्यांजली','होंगे जुदा ना हम' मालिकांमध्ये काम केलं. शिवाय काही बॉलिवूड सिनेमे केले.6 / 7मुस्लिम कुटुंबातून येत असल्याने आमनाला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आईवडिलांचं मन वळवावं लागलं. अभिनयात येण्यासाठी तिला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. 7 / 7प्रोफेशनल आयुष्यात यश मिळत असताना २०१३ साली आमनाने निर्माता अमित कपूरसोबत लग्नगाठ बांधली. हिंदु पद्धतीने त्यांचं लग्न झालं. २०१५ साली आमनाने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव आरिन ठेवण्यात आलं.