धमाका!!! टायगर 3 ते पठान..., 2023 मध्ये रिलीज होणार हे 12 बिग बजेट सिनेमे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:25 IST
1 / 12प्रभास आणि सैफ अली खानचा ‘आदिपुरूष’ हा सिनेमा 2023 मध्ये पाहायला मिळणार आहे. 12 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा पे्रक्षकांच्या भेटीस येतोय.2 / 12रणबीर कपूर, परिणीती चोप्रा, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. संदीप रेड्डी दिग्दर्शित हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 ला रिलीज होणे अपेक्षित आहे.3 / 12गेल्या महिन्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमाचा टीझर रिलीज केला. 2023 मध्ये नाताळच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे.4 / 12शाहिद कपूरचा ‘बुल’ हा सिनेमाही रिलीजच्या रांगेत आहे. हा सिनेमाही पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.5 / 12फाइटर या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी पहिल्यांदा झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा 2023 साली रिलीज होतोय.6 / 12कभी ईद कभी दिवाळी या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. 30 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.7 / 12 ‘गहराइयां’ या सिनेमातील अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. आता ही जोडी ‘खो गए हम कहां’ या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमाही 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.8 / 12श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरची जोडी लव रंजनच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं टायटल अद्याप ठरलेलं नाही. हा सिनेमा 8 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होतोय.9 / 12शाहरूख खानचा ‘पठान’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे. जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.10 / 12रॉकी और रानी की प्रेम कहानी हा रणवीर सिंग आणि आलिया भटचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 10 फेबु्रवारी 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.11 / 12अरूण गोपालन यांनी दिग्दर्शित केलेला ‘तेहरान’ हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये चित्रपटगृहांत झळकणार आहे.12 / 12‘टायगर 3’ हा चित्रपट सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षीत सिनेमा. 2023 च्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.