Join us

IN PICS : कधीकाळी चेहरा पाहून केलं जायचं रिजेक्ट, आज याच बॉलिवूड स्टार्सवर सारं जग फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 08:00 IST

1 / 11
या यादीत पहिले नाव महानायक अमिताभ बच्चन यांचे आहे, यावर विश्वास होणार नाही. करिअरच्या सुरुवातीला अमिताभ यांना त्यांच्या उंचीमुळे, दिसण्यामुळे नाकारण्यात आले. कोणीही त्यांना हिरो म्हणून साईन करायला तयार नव्हते. पुढे याच चेहºयाने इतिहास रचला, ते तुम्ही जाणताच.
2 / 11
90च्या दशकाचा सुपरस्टार गोविंदा आज भलेही फिल्मी इंडस्ट्रीत दिसत नसला तरी एकेकाळी तो टॉपचा हिरो होता. याच गोविंदालाही नकार पचवावे लागलेत. खूप अधिक यंग दिसतो या कारणाने अनेकदा त्याला रिजेक्ट करण्यात आले होते.
3 / 11
शाहरूख खान यालाही स्ट्रगल काळात लूक्समुळे अनेक नकार पचवावे लागले. छोट्या पडद्यावरून सुरुवात केल्यानंतर कुठे त्याला बॉलिवूडमध्शे एन्ट्री मिळाली.
4 / 11
अजय देवगण आज सुपरस्टार आहे. पण एकेकाळी त्याला पाहून दिग्दर्शक व निर्माते नाक मुरडायचे. त्याच्या सावळ्या रंगामुळे त्याला घेण्यास कोणीच फार उत्सुक नव्हते.
5 / 11
इरफान खान आज आपल्यात नाही. करिअरच्या सुरुवातीला त्यालाही चेहºयामुळे नकार सहन करावे लागलेत.
6 / 11
रणवीर सिंग याला नॉर्थ इंडियनसारखा दिसतो म्हणून सुरुवातीला काळात अनेक दिग्दर्शक-निर्मात्यांनी रिजेक्ट केले, यावर विश्वास बसणार नाही.
7 / 11
अनुष्का शर्मा आज आघाडीची अभिनेत्री आहे. पण आधी फार मामुली दिसते म्हणून तिला टीका व नकार सहन करावे लागलेत.
8 / 11
कतरिना कैफच्या विदेशी चेह-यामुळे सुरूवातीच्या काळात तिला सर्वांकडून नकार मिळत. हिंदी येत नाही यामुळेही तिला घ्यायला निर्माते-दिग्दर्शक तयार नसत.
9 / 11
नवाजुद्दीन सिद्दीकीचा चेहरा पाहताच त्याला रिजेक्ट केले जायचे. पण पुढे अभिनयाच्या जोरावर नवाजने स्वत:ला सिद्ध केले.
10 / 11
साऊथ सुपरस्टार धनुषचे आधीचे सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर त्याला का रिजेक्ट केले जात होते, ते तुम्ही समजू शकता.आज हाच धनुष चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.
11 / 11
कोंकणा सेन हिला तिच्या लुक्समुळे अनेकदा नकार पचवावे लागलेत.
टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनअजय देवगणगोविंदा